मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत गुरुवारी अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला. भाजप मंत्री दिलीप कांबळे यांनी सभागृतहातच दिलेल्या धमकीमुळे विरोधक मंत्र्यांच्या अंगावरच धावून जाताना दिसले.
त्याचं झालं असं की, राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांनी विद्यार्थ्यी स्कॉलरशिपबद्दल अनेक प्रश्न विचारले. यावर दिलीप कांबळे यांनी सभागृहातच त्यांना 'बाहेर भेट, मग तुला दाखवतो' असं वक्तव्य केलं.
यानंतर विरोधकांनी एकच गलका केला. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या वक्तव्यानं विरोधक चांगलेच संतापलेले दिसले. दिलीप कांबळे यांनी माफी मागितली नाही तर कामकाज चालू देणार नाही अशी भूमिकाच विरोधकांनी घेतली.
महाराष्ट्राची विधान परिषद या गोंधळामुळे चार वेळा स्थगित करावी लागली.