मुंबई : शहरात राज्य शासनातर्फे १२०० वायफाय सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्याआधी रेल्वे प्रशासनाने मुंबईतील महत्वाच्या स्टेशनवर वाय-फाय सुविधा सुरु करण्याची घोषणा केली. त्यानुसार मुंबई सेंट्रल रेल्वे येथे सुरु करण्यात आलेय. आता तर महत्वाच्या प्रमुख स्टेशनवर ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राची राजधानी असलेलं मुंबई शहर लवकरच पूर्ण वाय-फाय होणार आहे. १ मे २०१७ ला मुंबई शहर वाय-फाय करणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
मुंबईतील १२०० ठिकाणी ही वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २० एमबीपीएस स्पीडने वायफाय मिळेल. त्यामुळे आता हायफाय मुंबई वाय-फाय देखील होणार आहे. त्याआधी मुंबईत काही ठिकाणी राजकीय पक्षांनी वाय-फाय मोफत सुरु केले होते. यावरुन राजकारणही सुरु झाले होते.