राज्यात उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा

महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्कवर मुख्य शासकीय कार्यक्रम पार पडला. राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी दिमाखदार संचलन पार पडलं.

Updated: May 1, 2015, 12:55 PM IST
राज्यात उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा title=

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्कवर मुख्य शासकीय कार्यक्रम पार पडला. राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी दिमाखदार संचलन पार पडलं.

राज्यपाल सी.  विद्यासागर राव यांना मानवंदना देण्यात आली. मुंबई पोलिस, मुंबई वाहतूक शाखा आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी संचलनात भाग घेतला होता. विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राज्यभरात आज महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अहमदनगर येथे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पोलिस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पोलिस दलाच्या विशेष बँडसह पोलीस प्रशासनाच्या वेगवेगळ्या पथकांनी संचालन केलं. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी आणि नागरिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.  यात विशेष म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. 

 नव्या पालघर जिल्हामध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. आदिवासी विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णु सावरा यांच्या हस्ते पोलीस मैदानावर ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी जिल्ह्यातील तेरा ग्रामपंचायतीना चांगल्या कामाबद्दल प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्यात.  महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राने देशाच्या विकासासाठी आजवर अभूतपूर्व योगदान दिले असून महाराष्ट्र विचारवंत, संत आणि शूर-वीरांची भूमी असल्याचे म्हणत मोदींनी महाराष्ट्राचे कौतुक ट्विटमध्ये दिलेल्या संदेशात केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.