मुंबई महापालिकेच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढा : राष्ट्रवादी

शिवसेना - भाजपची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. 

Updated: May 1, 2015, 09:49 AM IST
मुंबई महापालिकेच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढा : राष्ट्रवादी title=

मुंबई : शिवसेना - भाजपची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. 

पालिकेचे नवे आयुक्त अजेय मेहता यांना भेटल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे माजी आमदार सचिन अहीर यांनी ही मागणी केली. शिवसेनेनं काय करून दाखवलं हे जनतेसमोर येण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

एकूण बजेटच्या केवळ तीस टक्के कामे होणार असतील मुंबईचा विकास कसा होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नवा विकास आराखडा रद्द झाल्याचं सरकारनं जाहीर केलं असलं तरी, जनतेमध्ये याबाबत संभ्रम असल्याचं त्यांनी सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.