मुंबई : डिजिटल व्यवहारात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.
डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं लकी ग्राहक योजना सुरु केली. या लकी ग्राहक योजनेतल्या पहिल्या पाच लकी ग्राहकांत, महाराष्ट्रातल्या दोघा विजेत्यांचा समावेश आहे.
मुंबईतल्या घाटकोपरचे अमित अनिल जाधव आणि नाशिकचे मंगेश अनंतराव जाधव अशी या लकी ग्राहकांची नावं आहेत.
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तामिळना़डू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक ही राज्यंही डिजिटल व्यवहारात पुढे आहेत. त्यामुळे सर्वाधिक लकी ग्राहक याच राज्यांतली आहेत.
त्यातही सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकांचं राज्य म्हणून महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे.