मुंबई : शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाचं घोडं सध्या अडले आहे. दरम्यान, भाजपने आपल्या संभाव्य 114 उमेदवारांची यादी तयार केलीय.
तर दुसरीकडे यादीबाबत शिवसेनेकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. यादीबाबत चर्चा करण्यास शिवसेनेनं नकार दिल्याची माहिती भाजप सूत्रांकडून सांगण्यात आली.
शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक असलेल्या काही जागांवर भाजपने दावा केलाय. त्यामुळे ही यादी बाहेर आली तर शिवसेना नगरसेवक फुटतील, अशी भीती शिवसेनेला वाटत आहे.
त्यामुळंच शिवसेनेचं जागावाटपाची चर्चा थांबवल्याचं भाजपच्या गोटातून सांगितलं जातंय. त्यामुळं भाजपनं तूर्तास 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतलीय.