महाराष्ट्राचं हक्काचं पाणी गुजरातला जावू देणार नाही - मुख्यमंत्री

महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यातला एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलंय. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी दमणगंगा-पिंजार नदीजोड प्रकल्पातील पाणी महाराष्ट्रालाच मिळणार असल्याचं स्पष्ट केलं.  

Updated: Mar 12, 2015, 06:56 PM IST
महाराष्ट्राचं हक्काचं पाणी गुजरातला जावू देणार नाही - मुख्यमंत्री title=

मुंबई: महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यातला एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलंय. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी दमणगंगा-पिंजार नदीजोड प्रकल्पातील पाणी महाराष्ट्रालाच मिळणार असल्याचं स्पष्ट केलं.  

तसंच जोपर्यंत सेना-भाजप सरकार सत्तेवर आहे, तोपर्यंत मराठी माणसाच्या बाजूनंच सरकार उभं राहिलं, आणि मराठी माणूस मुंबईबाहेर जाणार नाही याची काळजी घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी अजित पवारांच्या शिफारशीची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. राज्यात गु्हेगारांना जरब बसविण्यासाठी शिक्षेचं प्रमाण वाढवण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितल. ड्रग्जची संपूर्ण साखळी उध्वस्त करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.