मुंबई : येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तला वारंवार मिळणा-या रजेबाबत चौकशी होणार आहे.. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी ही माहिती दिलीय.. संजय दत्तला झुकतं माप दिलं जात असेल तर संबधितांवर कारवाई होणार असल्याचंही शिंदे यांनी म्हटलंय..
येरवडा जेलमध्ये कैदेत असलेला संजय दत्त दोन दिवसांपूर्वी फर्लोच्या रजेवर जेलबाहेर आलाय..
पुण्याच्या जेल उपमहानिरीक्षकांना या संदर्भात चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. संजय दत्त सुटी घेऊन बाहेर येऊ शकतो आणि इतर कोणालाही अशी सुटी देण्यात येत नसेल तर याची चौकशी झाली पाहिजे. त्याला कोणत्या आधारावर सुटी देण्यात येते याची चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे.
१९९३ च्या बॉम्ब स्फोटात एक के ५६ रायफल ठेवल्याप्रकरणी ५५ वर्षीय अभिनेता संजय दत्त याला दोषी ठरविण्यात आले. त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेदरम्यान त्याला अनेक वेळा पॅरोलवर जेलमधून सोडण्यात आले. या वेळीही त्याला १४ दिवसांच्या सुट्टीवर येरवडा जेलमधून सोडण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.