स्वत:च्या मुलाची हत्या करून महिलेची आत्महत्या

मुंबईतल्या माहिम भागात एका आईनंच आपल्या आठ महिन्यांच्या मुलाची क्रूर हत्या केली आहे. त्यानंतर या महिलेनं स्वतःही आत्महत्या केली. 

Updated: Jun 11, 2015, 05:57 PM IST
स्वत:च्या मुलाची हत्या करून महिलेची आत्महत्या title=

रौनक कुकडे, झी मीडिया, मुंबई: मुंबईतल्या माहिम भागात एका आईनंच आपल्या आठ महिन्यांच्या मुलाची क्रूर हत्या केली आहे. त्यानंतर या महिलेनं स्वतःही आत्महत्या केली. 

माहिम भागात राजीव हाऊसिंग सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. ४२ वर्षीय स्वरा कासकर आणि तिच्या आठ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला. चाकूनं महिलेनं पहिले मुलाची हत्या करून स्वत: आत्महत्या केली. घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली.  

या सुसाईड नोटमध्ये आपण मानसिक तणावाखाली असून भविष्यात मुलाचं काय होणार, हा विचार करून आपण हे पाऊल उचलत असल्याचं तिनं लिहिलंय. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून महिलेचे नातेवाईक आणि नवऱ्याचीही चौकशी सुरू आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.