मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलाय. 

Updated: Jan 29, 2017, 08:17 AM IST
मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक title=

मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलाय. 

मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानका दरम्यान अप फास्ट तर हार्बरच्या सीएसटी ते चुनाभट्टी-माहीम दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. 

या दरम्यान सीएसटी ते चुनाभट्टीमधील अप  आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद राहील. प्रवाशांच्या सोईसाठी कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक आठवरुन पनवेलसाठी विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. 

मेन लाईनवरील अप फास्ट मार्गावरील कामांमुळे मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप फास्ट मार्गावरील वाहतूक सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अप स्लो मार्गावरुन वळवण्यात येणार आहे.