तरुणीला दिली फेसबूकवर न्यूड फोटो शेअर करण्याची धमकी

फेसबूकवर तरुणा असवानी हिची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय. तरुणा सायबर बुलिंगची शिकार ठरली आहे. हॅकरने तरुणाला इमेल पाठवून धमकी दिली आहे. तरुणीचे काही प्रायवेट फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी तिला देण्यात आली आहे. तरुणाने त्याचा स्क्रीनशॉट तिच्या फेसबूक प्रोफाईलवर शेअर केला आहे.

Updated: Oct 25, 2016, 01:59 PM IST
तरुणीला दिली फेसबूकवर न्यूड फोटो शेअर करण्याची धमकी title=

मुंबई : फेसबूकवर तरुणा असवानी हिची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय. तरुणा सायबर बुलिंगची शिकार ठरली आहे. हॅकरने तरुणाला इमेल पाठवून धमकी दिली आहे. तरुणीचे काही प्रायवेट फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी तिला देण्यात आली आहे. तरुणाने त्याचा स्क्रीनशॉट तिच्या फेसबूक प्रोफाईलवर शेअर केला आहे.

तिने म्हटलं आहे की, मागील २४ तासात मला दोन इमेल आले आहेत. कोणीतरी माझं अकाऊंट हॅक केलं आहे. आता मला धमकी मिळत आहे की, तो माझे प्रायवेट फोटो आणि व्हिडिओ लीक करणार आहे. जे फोटो मी माझ्या बॉयफ्रेंडला पाठवले होते.

पुढे ती म्हणते की, त्याने माझे फोटो लीक केले तरी चालेल पण मी याविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे.

या इमेलमध्ये अतिशय अश्लिल भाषा वापरण्यात आली आहे. या तरुणीने फेसबूकवर ही पोस्ट टाकल्यानंतर अनेक जण तिच्या समर्थनात पुढे आले आहेत आणि अनेकांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे.