www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
म्हाडाच्या लॉटरीकडे डोळे लावून राहिलेल्या मुंबईकर आणि कोकणवासियांना आपले नाव लॉटरी प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले की नाही याची खात्री करून घेण्यासाठी म्हाडाने पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.
म्हाडाने आपल्या साइटवर ही यादी दिली आहे. त्यात मुंबई आणि कोकण विभागाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात तुम्ही तुमचे नाव आहे का याची खात्री करू शकतात.
म्हाडाच्या लॉटरीसाठी पात्र लोकांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा.
कसे पाहणार तुम्ही तुमचे नाव
1) म्हाडाच्या यादीच्या लिंकवर क्लिक करा
2) त्यात मुंबई आणि कोकण असे दोन विभाग दिले आहेत. त्यातील आपला विभाग निवडा.
3) त्यानंतर आपण ज्या योजना क्रमांकात फॉर्म भरला आहे. ते निश्चित करा. त्यानंतर कोणत्या कॅटेगरीत फॉर्म भरला आहे ती कॅटेगरी सिलेक्ट करा. (उदा. तुम्ही Scheme : 305 MAGATHANE, BORIVALI मध्ये सामान्य कॅटेगरीत भरला असेल तर GP १५ या लिंकला क्लिक करा.
4) त्यानंतर एक पीडीएफ फाइल ओपन होईल. त्या ctrl F (कंट्रोल एफ) बटण दाबा. त्यानंतर फाइंड ही कमांड येईल त्यात तुमचे नाव टाइप करा.
5) नाव असल्यास तुमचे अभिनंदन आणि नाव नसल्यास पुढच्या लॉटरीसाठी तयार राहा.
म्हाडाच्या लॉटरीसाठी पात्र लोकांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.