मुंबई : आगामी ५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपला जर चांगलं यश मिळालं तर मग महाराष्ट्रात शिवसेनेशी कायमची युती तोडून स्वबळावर निवडणुका लढून राज्यातही सत्ता आणण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. त्यामुळे राज्यात मध्यवती निवडणुका होणार अशी चर्चा रंगू लागली आहे.
राज्यात नुकताच झालेल्या महापालिका, जिल्हापरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणूकीत शिवसेना-भाजपची २५ वर्षाची तुटली. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. मुंबई महापालिकेत दोघं पक्षाना बहुतम मिळवता आलं नाही. त्यामुळे मुंबईचा महापौर आपला व्हावा म्हणून दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु झाला आहे.
भाजपने या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळवलं. नाशिक, पुणे, पिंपरी -चिंचवड, नागपूर, उल्हासनगरमध्ये भाजपला चांगलं यश मिळालं त्यामुळे राज्यात ही आपल्याला चांगलं यश मिळू शकतं असं भाजपला वाटतंय. शिवसेनेकडून होणारी सततची टीका यामुळे शिवसेनेसोबत सतेत राहणं भाजपला कठीण झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यामध्ये एका नव्या प्लॅनवर चर्चा झाल्याचं एका इंग्रजी वृत्तपत्राने सांगितलं आहे.