जनतेच्या पैशांचा चुराडा, मंत्र्यांनी विमानवर उडविले ६ कोटी

महागाई आणि करांच्या ओझ्यामुळे सामान्य जनता दबली असताना जनतेचा पैसा मात्र मंत्र्यांकडून बेपर्वाईने खर्च केला जात आहे. आपल्या आरामदायक प्रवासासाठी मंत्र्यांनी तीन वर्षांत तब्बल कोट्यवधी रुपये केवळ विमान प्रवासावर उडवले आहेत. याचा आकडा तीन वर्षांत ६ कोटी २८ लाखावर गेलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 19, 2013, 03:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया ,मुंबई
महागाई आणि करांच्या ओझ्यामुळे सामान्य जनता दबली असताना जनतेचा पैसा मात्र मंत्र्यांकडून बेपर्वाईने खर्च केला जात आहे. आपल्या आरामदायक प्रवासासाठी मंत्र्यांनी तीन वर्षांत तब्बल कोट्यवधी रुपये केवळ विमान प्रवासावर उडवले आहेत.
राज्यातल्या मंत्र्यांची कोट्यवधींची उड्डाणे, मंत्र्यांच्या विमानप्रवासावर राज्यसरकारचे एका वर्षात २ कोटी १० लाख खर्च केल्याचे पुढे आलेय. मंत्र्यांमध्ये वनमंत्री पतंगराव कदम यांच्या विमानानाने सर्वांना मागे टाकत आपलं प्रवासाचं विमान टेक ओव्हर करत बाजी मारली.
एकीकडे राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. सरकारी अधिका-यांना काटकसरीचे आदेश राज्य सरकारने दिले. मात्र राज्याचे मंत्री ही परिस्थिती माहिती असूनही उधळपट्टीत दंग झालेले दिसत आहेत. मंत्र्यांच्या विमान प्रवासावर वर्षाला २.१० कोटींचा खर्च झालाय. याचा आकडा तीन वर्षांत ६ कोटी २८ लाखावर गेलाय.
राज्य मंत्रिंडळातल्या बहुतेक सर्वच मंत्र्यांनी विमानाच्या प्रवासाला पसंती दिलीय. रेल्वे किंवा एसटी प्रवास तर आता ते करतच नाहीत. त्यांच्या विमान प्रवासावरचा खर्च पाहीला तर डोळे पांढरे होतील. मंत्र्यांच्या विमान प्रवासावर गेल्या तीन वर्षांत सरकारचे ६ कोटी २८ लाख खर्च झालेत. वनमंत्री पतंगराव कदम यांनी सर्वाधिक विमान प्रवास करणारे मंत्री अशी ख्याती मिळवली आहे. त्यांच्या प्रवासावर ४२ लाख रूपये खर्च झालेत.
पाहा किती उडविलेत पैसे
- वनमंत्री डॉ. पतंगराव कदम - ४२ लाख ४० हाजार रूपये
- अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख - ३९ लाख ५४ हजार रूपये
- कृषीमंत्री राधाकृष्ण विखेपाटील - ३६ लाख ४ लाख रूपये
- शालेय शिक्षण राज्य मंत्री ३२ लाख ४८ हजार रूपये
- उद्योग मंत्री नारायण राणे - ३१ लाख ३९ हजार
- रोजगार हमी योजना मंत्री डॉ. नितीन राऊत - २८ लाख ९३ हजार रूपये
- जलसंपदा मंत्री सुनील तटकरे - २६ लाख ८८ हजार रूपये
- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात - २४ लाक ९५ हजार रूपये
- ग्रामविकास मंत्री जयंत पाटील - २१ लाख ९७ हजार रूपये
- सार्व.बांधकाम राज्यमंत्री जयदत्त क्षीरसागर - २० लाख ८३ हजार रूपये
- सामाजिक विभाग मंत्री शिवाजीराव मोघे - १९ लाख ७३ हजार रूपये
- शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा - १९ लाख २९ हजार रूपये
- सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ - १८ लाख रूपये

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४
तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ