कुर्ल्यात मनसे नगसेवकावर हल्ला, राज ठाकरेंनी घेतली रुग्णालयात भेट

मनसेचे कलिना वॉर्ड क्रमांक 166 मधले विजयी उमेदवार संजय तुरडे आणि पक्षाच्या जखमी कार्यकर्त्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजावाडी हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 25, 2017, 11:35 AM IST
कुर्ल्यात मनसे नगसेवकावर हल्ला, राज ठाकरेंनी घेतली रुग्णालयात भेट title=

मुंबई : मनसेचे कलिना वॉर्ड क्रमांक 166 मधले विजयी उमेदवार संजय तुरडे आणि पक्षाच्या जखमी कार्यकर्त्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजावाडी हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. 

कुर्ला येथे तुरडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर भाजपा पराभूत उमेदवार सुधीर खातू आणि त्यांच्या समर्थकांनी निकालांनंतर धारधार शस्त्रासह प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्यात तुरडे यांच्यासह मनसेचे १० ते १२ कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत. 

सध्या ते उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत हेही राजावाडी रुग्णालयात आले होते. 

राज ठाकरे यांनी तुरडे यांच्या कुटुंबियांना धीर दिला तर वैद्यकीय अधिकाऱयांकडून जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली. दरम्यान याप्रकरणात पोलीस योग्य तपास आणि कार्यवाही करीत नसल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिका-यांनी केला.