मॉडेल बलात्कार प्रकरण : सुनील पारसकरांच्या निलंबनाची शिफारस

 बलात्काराचा आरोप असलेले मुंबईतील पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना निलंबित करण्याची शिफारस राज्याच्या गृह मंत्रालयाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्यामुळे पारसकर यांचे निलंबन होण्याची शक्यता आहे.

Updated: Aug 26, 2014, 03:49 PM IST
मॉडेल बलात्कार प्रकरण : सुनील पारसकरांच्या निलंबनाची शिफारस title=

मुंबई : बलात्काराचा आरोप असलेले मुंबईतील पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना निलंबित करण्याची शिफारस राज्याच्या गृह मंत्रालयाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्यामुळे पारसकर यांचे निलंबन होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी पारसकर यांना मुंबईतील न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. पारसकर यांना ताब्यात घेऊन चौकशीची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. मुंबईतील एका मॉडेलने पारसकर यांच्याविरोधात विनयभंग आणि बलात्काराचा आरोप केला होता.

गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. बलात्कारप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताना संबंधित मॉडेलने प्राथमिक निष्कर्ष अहवालात जी माहिती दिली होती ती बरीचशी आठवणींच्या आधारे दिली होती. त्यानंतर पुरवणी जबाबामध्ये तिने काही पुरावे सादर केले आहेत. त्यामध्ये पारसकर यांना दिलेले ६७ हजार ५७५ रुपयांचे लॉनजिन्स ब्रँडचे घडय़ाळ, २१ हजार ६०० रुपये किमतीचे पाकीट, ३३ हजार रुपयांचे माऊंट ब्लँक पेन आणि पाच हजार रुपयांचे परफ्युम या भेटवस्तूंच्या बिलांचा समावेश आहे. 

गोरेगाव पोलीस ठाण्याने संबंधित मॉडेलच्या बाजूने गुन्हा दाखल केल्यानंतर या भेटवस्तू देण्यात आल्या, असे या जबाबात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर पारसकर यांनी आयफोन भेट दिला होता. हा फोन मॉडेलने सादर केला असून त्यात 'व्हॉटस्अ‍ॅप'वरील संदेश आणि फोनमधील एसएमएस तपासण्याची विनंती केली आहे.

वाशी येथील ज्या फ्लॅटमध्ये विनयभंग झाला त्या फ्लॅटमध्ये आपण आणि पारसकर एकत्र गेल्याचा पुरावा म्हणून सोसायटीचे रजिस्टर तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. या रजिस्टरमध्ये पारसकर आणि मॉडेलचे गाडी क्रमांक नोंदल्याचे आढळून आले आहे. तर मढमधील ज्या बंगल्यात बलात्कार झाल्याचा दावा केला या मॉडेलने केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.