मुंबईत विश्रांती, पुणे, नाशिक, विदर्भाकडे पावसाचा मोर्चा

राज्यातल्या जवळपास सर्व भागात आता पावसाला सुरूवात झालीय. मुंबईत गेले तीन दिवस कोसळणा-या पावसाने आज थोडी विश्रांती घेतली. पावसाने आता आपला मोर्चा नाशिक पुणे नागपूर या शहरांकडेही वळवलाय. काल पहाटेपासून पुण्यात कोसळत असलेल्या पावसाने जूनची सरासरी ओलांडलीय. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने 14 गावांची संपर्क तुटलाय. तर संपूर्ण विदर्भासह नागपूरमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावलीय. पावसाने शहरात एक बळी घेतलाय. 

Updated: Jun 22, 2015, 09:06 PM IST
मुंबईत विश्रांती, पुणे, नाशिक, विदर्भाकडे पावसाचा मोर्चा title=

मुंबई : राज्यातल्या जवळपास सर्व भागात आता पावसाला सुरूवात झालीय. मुंबईत गेले तीन दिवस कोसळणा-या पावसाने आज थोडी विश्रांती घेतली. पावसाने आता आपला मोर्चा नाशिक पुणे नागपूर या शहरांकडेही वळवलाय. काल पहाटेपासून पुण्यात कोसळत असलेल्या पावसाने जूनची सरासरी ओलांडलीय. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने 14 गावांची संपर्क तुटलाय. तर संपूर्ण विदर्भासह नागपूरमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावलीय. पावसाने शहरात एक बळी घेतलाय. 

पुण्यात पावसाची दमदार हजेरी 

रविवार सकाळपासूनच पुण्य़ामध्ये मॉन्सुनने  दमदार हजेरी लावली...यंदाच्या मॉन्सूनमध्ये पहिल्यादांच पुणेकरांनी मुसळधार पावसाचा अनुभव घेतला.. पुण्यात काल दिवसभरात 60.2 मिमी पावसाची नोंद झाली... काल पहाटेपासुन पडणा-या पावसामुळे पावसाने पुण्यातील जूनची सरासरी ओलांडलीय...1 जून पासुन पुण्यात 153.3 मिमी पावसाची नोंद झालीय. ही आकडेवारी सरासरीच्या 15.6 मिमी ने जास्त आहे...गेल्या वर्षी जून महिन्यामध्य़े फक्त 13.8 मिमी पावसाची नोंद झाली होती....दरम्यान धरणक्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने पुण्याला पाणिपुरवठा करणा-या वरसगाव, पानशेत, टेमघर, आणि खडकवासला या धरणांच्या पातळीत वाढ होऊन धरणांमधील पाणिसाठा 2.84 टीएमसी इतका झालायं.... गेल्या वर्षाी म्हणजे 2014 मध्ये पाणिसाठा 2.04 इतका होता...

नागपूर शहरात १५३ मिमी पाऊस
राज्यात कोसळणाऱ्या पावसानं संपूर्ण विदर्भासह नागपुरात दमदार हजेरी लावली आहे. एकट्या नागपूर शहरात काल सकाळी ८.३० ते आज सकाळी ११.३० दरम्यान,  १५३ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसानं एक बळी घेतला असून शहरातील अनेक भाग जलमय झालेत. 

भुशी डॅम वाहू लागलाय
यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्याच्या अखेरीलाच लोणावळ्याचा भुशी डॅम भरून वाहू लागलाय. मान्सून पिकनिकसाठी पर्यटकांची अत्यंत आवडती जागा म्हणून भुशी डॅमचा लौकिक आहे. कालपासून लोणावळ्यात जवळपास 160 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. त्यामुळे मुसळधार पावसानं लोणावळा परिसरातले ओढे, धबधबे भरभरून वाहू लागले आहेत. त्यामुळे भुशी धरण  नेहमीपेक्षा वीस दिवस आधीच भरल्यानं आतच पर्यटकांना चांगली पर्वणी लाभलीय. 

पावसासंदर्भातही राज्यातल्या इतरही बातम्या पाहूयात...

1) कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर आजही कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 771 मिलीमिटर पावसाची नोंद झालीय.  सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात सरासरी 128 मिमी एवढा झालाय. जिल्ह्यातील सहा तालुक्यात अतिवृष्टी झालीय. पंचगंगेच्या पाणी पातळीत  3 दिवसात 10 फूटाने वाढ झाली आहे. राजाराम बंधा-यासह जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

2) नाशिक जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच पावसाने चांगलाच जोर धरलाय. मुसळधार पावसाने नाशिक घोटी, इगतपुरी, त्रिंबक परिसराला चांगलंच झोडपलंय. समाधानाची बाब म्हणजे धरणक्षेत्रात पाऊस पडल्याने धरणातही पाणीसाठा जलदगतीने वाढतोय. दारणा नदीला पूर आल्याने चौदा गावांचा संपर्क तुटलाय. 

3) भंडारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात झालेल्या संततधार पावसामुळे झिल्यातील वैन गंगा नदी तुडूंब भरलीय. तसंच शहरातील सखोल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. शहरात तब्बल १८० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. 

4) काही दिवसांच्या विश्रांती नंतर जळगावमध्ये आज सुमारे अर्धा ते पाऊण तास जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारी झालेल्या मुसळधार पावसानंतर मात्र वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झालाय. भुसावळ तसंच अमळनेर तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नदी नाले वाहून निघाले. 

5) पालघर जिल्ह्याला  गेल्या २४ तासात पावसानं चांगलेच झोडपलं असून 130 मिमी पावसांची नोंद झालीय. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहतायत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.