३ कोटींहून अधिक मतदार बजावणार आपला हक्क

 10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांसाठी मतदानाला सुरूवात झालीय. सकाळी साडे सात ते साडे पाच पर्यंत मतदानाची मुदत आहे. जवळपास तीन कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

Updated: Feb 21, 2017, 08:22 AM IST
३ कोटींहून अधिक मतदार बजावणार आपला हक्क title=

मुंबई : 10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांसाठी मतदानाला सुरूवात झालीय. सकाळी साडे सात ते साडे पाच पर्यंत मतदानाची मुदत आहे. जवळपास तीन कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, पिंपरी-चिंचवड, उल्हास नगर, अमरावती ,अकोला या महापालिकांमध्ये मतदान सुरू झालं आहे. मिनीविधानसभेची निवडणूक म्हणून प्रसिद्ध झालेल्या या निवडणूकीसाठी  बहुतांश ठिकाणी सर्वच महत्वाचे पक्ष स्वतंत्र लढतायत. त्यामुळे लढती चुरशीच्या असणार आहेत. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगानं विशेष प्रयत्न केले आहेत.