मुंबई, ठाणे, पुण्यासह 10 महापालिका आणि जिल्हा परिषद - पंचायत समितीसाठी आज मतदान

मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिका आणि जिल्हा परिषदां आणि 118 पंचायत समित्यांमध्ये आज मतदान होत आहे. थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल.

Updated: Feb 23, 2017, 07:58 AM IST
मुंबई, ठाणे, पुण्यासह 10 महापालिका आणि जिल्हा परिषद - पंचायत समितीसाठी आज मतदान title=

मुंबई : मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिका आणि जिल्हा परिषदां आणि 118 पंचायत समित्यांमध्ये आज मतदान होत आहे. थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल.

ही निवडणूक स्थानिक स्वराज्यसंस्थेची असली तरी या सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानं सा-यांच्या नजरा याकडे लागल्यात. आज सकाळी साडे सात वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया चालणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण 3 हजार 210 जागांसाठी 17 हजार 331 उमेदवारांमध्ये लढत होतीये.. यासाठी 43 हजार 160 मतदान केंद्रांची सोय करण्यात आलीय. तसेच 68 हजार 943 कंट्रोल युनिट आणि 1 लाख 22 हजार 431 मतदान युनिटसह यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

3 कोटी 77 लाख 60 हजार 812 मतदार आपला मदतानाचा हक्क बजावणार आहेत.. या मतदानासाठी निवडणूक आयोगासह पोलीस प्रशसन सज्ज झाले आहे. 23 तारखेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.