महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात तरुणीवर हल्ला

बंगळुरुमध्ये तरुणी विनयभंगाची घटना ताजी असतानाच देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही महिला असुरक्षितच असल्याची घटना समोर आलीय. 

Updated: Jan 6, 2017, 11:26 AM IST
महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात तरुणीवर हल्ला title=

मुंबई : बंगळुरुमध्ये तरुणी विनयभंगाची घटना ताजी असतानाच देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही महिला असुरक्षितच असल्याची घटना समोर आलीय. 

महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात एका तरुणीवर हल्ला करण्यात आलाय. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हा हल्ला केलाय. ही तरुणी ऑफिसवरुन घरी परतत असताना हा हल्ला झालाय. 

या हल्ल्यात ही तरुणी गंभीर जखमी झालीय. घटनेनंतर हल्लेखोर फरार झालाय. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. पीडित तरुणीला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.