केईएममधील डॉक्टरांचा संप सुरुच, रुग्णांचे होतायेत हाल

केईएममधील तीन डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्यानंतर निषेध म्हणून संपावर गेले आहेत. हा संप दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. मात्र, कोणताही तोडगा न निघाल्याने सामान्य रुग्णांचे हाल सुरु झाले आहेत. डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. एकाच्या चुकीमुळे सर्वसामान्यांना त्रास का, अशी प्रतिक्रिया रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत.

Updated: Sep 26, 2015, 09:14 AM IST
केईएममधील डॉक्टरांचा संप सुरुच, रुग्णांचे होतायेत हाल title=

मुंबई : केईएममधील तीन डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्यानंतर निषेध म्हणून संपावर गेले आहेत. हा संप दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. मात्र, कोणताही तोडगा न निघाल्याने सामान्य रुग्णांचे हाल सुरु झाले आहेत. डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. एकाच्या चुकीमुळे सर्वसामान्यांना त्रास का, अशी प्रतिक्रिया रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत.

जोपर्यंत आमच्या सुरक्षेचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका मार्डच्या डॉक्टरांनी घेतली आहे. त्यामुळे डॉक्टर रुग्णालयात नसल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. दरम्यान, प्रशासनाने तोडगा न काढल्याने संप कायम आहे.

काल एका लहान मुलाला रुग्णालयात आणले होते. त्याच दरम्यान, त्याचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त नातेवाईकांनी तीन निवासी डॉक्टरांना मारहाण केली होती. त्यामुळे डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले. त्यानंतर थेट संपाचे हत्यार  बाहेर काढले. ज्यावेळी मुलाला आणले त्यावेळी तो कोमात गेला होता, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु डॉक्टरांच्या  हलगर्जीपणे मुलाचा मृत्यू झाल्याचे दावा त्याचा नातेवाईकांनी केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.