मुंबई : एस्थर हत्याकांडात मुंबईच्या एका सत्र न्यायालयानं दोषी चंद्रभान सानप याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलीय.
निकाल देताना न्यायालयानं ही घटना 'रेअरेस्ट ऑफ रेअर' म्हणजे दुर्मिळ घटना असल्याचंही म्हटलंय. मंगळवारी चंद्रभान सानप याला दोषी ठरवण्यात आलं होतं.
अधिक वाचा - इस्थर अनुह्या हत्येप्रकरणी चंद्रभान सानप दोषी
गोरेगाव इथं आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये काम करणारी 23 वर्षीय एस्थर अनुहया हिच्यावर कॅब चालवणाऱ्या चंद्रभान सानपनं बलात्कार केला होता.
काय घडलं होतं नेमकं...
मूळची आंध्रप्रदेशनची असलेली एस्थर ख्रिसमसच्या सुट्ट्या संपवून मुंबईत सकाळी पाच वाजल्याच्या दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनसवर उतरली होती. प्लॅटफॉर्मवरच तिनं दक्षिण मुंबईस्थित आपल्या हॉस्टेलवर जाण्यासाठी 300 रुपयांत चंद्रभानची कॅब बुक केली होती. परंतु, स्टेशनमधून बाहेर आली तेव्हा चंद्रभानकडे कॅब नव्हती तर बाईक होती.
अधिक वाचा - इस्टरच्या हत्येचं गूढ उकललं, आरोपीला अटक
जवळपास एक तासापर्यंत दुसरा पर्याय न मिळाल्यानं एस्थर चंद्रभानसोबत बाईकवर जाण्यासाठी तयार झाली. कांजुरमार्ग भागात पोहचल्यानंतर पेट्रोल संपल्याचं सांगत चंद्रभाननं बाईक बाजुला लावली... आणि बाजुच्या झाडीत इस्थरवर बलात्काराचा प्रयत्न केला. एस्थरनं प्रतिकार केला तेव्हा त्यानं मोठा दगड तिच्या डोक्यात घातला आणि दुपट्ट्यानं तिचा गळा दाबला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.