माजी प्रेयसीवर केमिकल हल्ला; जेरीट जॉनला पाच वर्षांची सक्तमजुरी

आपल्या माजी प्रेयसीवर केमिकल फेकल्याप्रकरणी चित्रपट निर्माता जेरीट जॉन या मुंबई सेशन्स न्यायालयाने दोषी ठरवलंय. या प्रकरणात जेरीटला पाच वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा न्यायालयानं ठोठावलीय.

Updated: Oct 9, 2015, 01:52 PM IST
माजी प्रेयसीवर केमिकल हल्ला; जेरीट जॉनला पाच वर्षांची सक्तमजुरी title=

मुंबई : आपल्या माजी प्रेयसीवर केमिकल फेकल्याप्रकरणी चित्रपट निर्माता जेरीट जॉन या मुंबई सेशन्स न्यायालयाने दोषी ठरवलंय. या प्रकरणात जेरीटला पाच वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा न्यायालयानं ठोठावलीय.

2012 साली ठाणे पोलिसांच्या पथकाने मीरा रोडवरील एका हॉटेलमधून जेरीट जॉन याला अटक केली होती. त्यानंतर जेरीटला मुंबई पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं होतं. माजी प्रेयसीवर केमिकल फेकल्याचा आरोपाखाली जेरीटला अटक करण्यात आली होती.

45 वर्षीय जेरीट जॉन हा विवाहीत असून त्यांचे एका 26 वर्षीय मुलीसोबत विवाहबाह्य संबंध होते. ही मुलगी फिजिओथेरपिस्ट आहे. जॉन यानं 9 नोव्हेंबर 2012 साली या मुलीच्या चेहऱ्यावर केमिकल फेकून तो तिथून पसार झाला होता. वरळीतल्या आदर्श कॉलनीतल्या घराच्या जिन्यातच जाऊन जॉननं या मुलीच्या चेहऱ्यावर केमिकल फेकलं होतं. 

अधिक वाचा - मुंबईत तरूणीवर अॅसिड हल्ला, एकतर्फी प्रेमातून हल्ला

या हल्ल्यात पीडित मुलगी गंभीर जखमी झाली होती पण, तिला तातडीनं हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आल्यानं तिचे प्राण वाचले होते. ही मुलगी आंतराराष्ट्रीय दर्जाची सायकलस्वार होती. 7 नोव्हेंबर 2012 रोजी ती मुलगी सकाळी आपल्या काही मित्रमैत्रिणींसोबत सायकलस्पर्धेहून परतत असताना जेरीटनं तिच्यावर केमिकल हल्ला केला होता. 

जॉनवर गंभीर दुखापत केल्याप्रकरणी तसंच मुलीच्या घरातून तिचा मोबाईल फोन पळवून नेल्यामुळे चोरी व हल्ल्यानंतर बळजबरीने तिला घरात कोंडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

'नो नॉन्सेन्स' नावाचं जॉनचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस असून टेलिव्हिजन कार्यक्रमांच्या निर्मातीचं तो काम करायचा... जॉनने काही चित्रपटांना सहाय्यक निर्माता म्हणूनही काम केलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.