मुंबई : मुंबईकरांची भूक वेळेत भागवणारे मुंबईचे डब्बेवाले आठवडाभरासाठी सुट्टीवर गेले आहेत. मुळशी, मावळ, राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर, अकोला, संगमनेर इत्यादी गावात ग्रामदेवता, कुलदैवतेची यात्रा असल्यामुळं डब्बेवाले गावी गेले आहेत. त्यामुळं 23 एप्रिलपर्यंत मुंबईतल्या डब्बेवाल्यांची डब्बे वाहतूक बंद राहणार आहे.
पुढचे सहा दिवस मुंबईकरांना डब्ब्याची सोय स्वतःच करावी लागणार आहे. सध्या उन्हाळी सुट्टी सुरू झाल्यानंतर अनेकांचे डबे बंद आहेत. अनेक जण गावी सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे त्या ग्राहकांचे डबेही बंद आहेत. 25 एप्रिलपासून ही डब्बे वाहतूक पूर्ववत सुरू होणार आहे.