मुंबई गँग रेप : फॉरेन्सिक टीम मुंबईत,‘परागकण’ची मदत

मुंबईत महिला फोटोग्राफर बलात्कार प्रकरणी तपास करण्यासाठी दोन फॉरेन्सिक टीम मुंबईत दाखल झाली आहे. केंद्रीय फॉरेन्सिक आणि गुजरात फॉरेन्सिक टीमनं शक्ती मील कंपाऊंड परिसरात पाहणी केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 27, 2013, 05:28 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मुंबईत महिला फोटोग्राफर बलात्कार प्रकरणी तपास करण्यासाठी दोन फॉरेन्सिक टीम मुंबईत दाखल झाली आहे. केंद्रीय फॉरेन्सिक आणि गुजरात फॉरेन्सिक टीमनं शक्ती मील कंपाऊंड परिसरात पाहणी केली.
शक्ती मील कंपाऊंडमध्ये २२ ऑगस्टला पाच नराधमांनी फोटो जर्नालिस्टवर बलात्कार केला होता. याप्रकरणी पाच नराधमांविरोधात अधिक पुरावे गोळा करण्यासाठी या दोन्ही फॉरेन्सिक टीमनं शक्ती मील कंपाऊंडमध्ये पाहाणी केली. या दोन्ही फॉरेन्सिक टीम अशाप्रकारच्या घटनांच्या तपासात महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळं मुंबई पोलिसांनी या दोन्ही टीम्सची मदत घेतलीय.
सामूहिक बलात्कार केला त्या घटनास्थळावरील ‘परागकण’ त्यांना लटकवणार आहेत. नराधमांविरुद्ध भक्कम पुरावे जमविण्यावर पोलिसांचा भर असून फॉरेन्सिक आणि वैद्यकीय चाचण्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. यासाठी खास केंद्रीय फॉरेन्सिक लॅबचे एक पथक मुंबईत आले आहेत. गुजरात फॉरेन्सिक लॅबचीही मदत घेतली जात आहे. डॉ. आशा श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली एस. के. चौधरी, बी. के. मोहपात्रा, हरिंद्र प्रसाद या फॉरेन्सिक एक्सपर्टचे एक पथक मुंबईत दाखल झाले आहे.
शक्ती मीलमध्ये ज्या ठिकाणी सामूहिक बलात्कार झाला त्या ठिकाणच्या वनस्पतीवरील परागकण हे पथक गोळा करणार आहे. हे परागकणच नराधम त्या ठिकाणी असल्याचे शिक्कामोर्तब करतील. आरोपीचे कपडे, बळीत महिलेचे कपडे यावरील परागकणांचे अंश आणि वनस्पतीवरील परागकण यांचे नमुने तपासणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x