मुंबईकरांना मिळाला नवा सेल्फी पॉईंट, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

सीएसटी स्टेशसमोर भर वाहनांच्या गर्दीतही आरामात उभं राहून आता सेल्फी काढता येणार आहे.

Updated: Apr 13, 2017, 06:33 PM IST
मुंबईकरांना मिळाला नवा सेल्फी पॉईंट, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन  title=

मुंबई : सीएसटी स्टेशसमोर भर वाहनांच्या गर्दीतही आरामात उभं राहून आता सेल्फी काढता येणार आहे. मुंबई महापालिकेसमोर नवा सेल्फी पॉईंट म्हणून ओळखल्या जाणा-या दर्शनी गॅलरीचं उद्घाटन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं.

या दर्शनी गॅलरीच्या उभारणीसाठी बीएमसीनं ९० लाख रु. खर्च केलेत. या गॅलरीतून मुंबईकरांना आणि पर्यटकांना सीएसटी आणि बीएमसी या दोन्ही हेरिटेज वास्तू पाहता येणारेत, त्यांना कॅमे-यात कैद करणं सोपं जाणार आहे. या गॅलरीमुळे पर्यटकांचा वाहतुकीला होणारा अडथळाही कमी होणार आहे.