मुंबईतल्या गोविंदांना घडणार अमेरिका वारी!

यंदा राज्याचं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे गोविंदा पथकांतील 25 निवडक गोविंदांना अमेरिका वारी घडणार आहे. दहीहंडी उत्सवानंतर हे पथक अमेरिकेला रवाना होतील. न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर इथं थरांची सलामी देण्याची संधी मिळणार असून महाराष्ट्रातील पर्यटन विकासाला चालना देण्याचा हेतू या माध्यमातून साधण्याचा प्रयत्न असेल.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 28, 2013, 08:44 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
यंदा राज्याचं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे गोविंदा पथकांतील 25 निवडक गोविंदांना अमेरिका वारी घडणार आहे. दहीहंडी उत्सवानंतर हे पथक अमेरिकेला रवाना होतील. न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर इथं थरांची सलामी देण्याची संधी मिळणार असून महाराष्ट्रातील पर्यटन विकासाला चालना देण्याचा हेतू या माध्यमातून साधण्याचा प्रयत्न असेल.
मुंबईतला दहीहंडी उत्सव बघण्यासाठी नेहमीच प्रचंड गर्दी होत असते. दहीहंडी फोडण्यासाठी थरावर थर रचण्याची स्पर्धाच गोविंदा पथकांमध्ये रंगते. याच पार्श्व भूमीवर राज्यातील पर्यटनवाढीला आणखी चालना देण्याच्या हेतूनं हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. मुंबई-ठाण्यातील सर्वाधिक थर लावणाऱ्या गोविंदा पथकांमधून 25 गोविंदांची निवड करण्यात येणार आहे. आवश्येकबाबींची पूर्तता करुन 23 सप्टेंबरला हे पथक मुंबईतून अमेरिकेला रवाना होईल, असं सांगण्यात येतंय. शिवाय लवकरच या उपक्रमाची घोषणा होणार आहे.
या २५ गोविंदांचा खर्च संकल्प प्रतिष्ठान उचलणार आहे. गोविंदांची परदेशवारी घडण्याची ही पहिलीच वेळ आहे असं नाही. याआधीही २००६मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी १० निवडक गोविंदांना स्पेन वारी घडविली होती. त्यावेळी मुंबईच्या संस्कृतीचं दर्शन स्पेनवासीयांना गोविंदांनी घडवलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.