मुंबईत ढाक्कुमाकुम, दहीहंडीसाठी `अलर्ट`

मुंबई ठाण्यासह राज्यातल्या गोविंदा पथकाच्या उत्साहाला उधाण आले आहे. ढाक्कुमाकुमच्या तालावर निघणार हंडी फोडायला, महिला पथकही सज्ज झाली आहेत. दरम्यान, दहीहंडीनिमित्त मुंबई पोलिसांकडून अलर्ट घोषित करण्यात आलाय. दहीहंडी उत्सवादरम्यान पोलिसांची विशेष नजर राहणार असून, तब्बल १५ हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत.

Updated: Aug 10, 2012, 08:26 AM IST

www.24taas.com,मुंबई
मुंबई ठाण्यासह राज्यातल्या गोविंदा पथकाच्या उत्साहाला उधाण आले आहे. ढाक्कुमाकुमच्या तालावर निघणार हंडी फोडायला, महिला पथकही सज्ज झाली आहेत. दरम्यान, दहीहंडीनिमित्त मुंबई पोलिसांकडून अलर्ट घोषित करण्यात आलाय. दहीहंडी उत्सवादरम्यान पोलिसांची विशेष नजर राहणार असून, तब्बल १५ हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत.
सोन्याची दहीहंडी, तब्बल 30 लाख रुपयांचे बक्षीस, स्पेनच्या पथकांची उपस्थिती अशा नेहमीच्याच जल्लोषात ठाण्याच्या संघर्षची दहीहंडी यावर्षीही रंगेल.... `माझा गोविंदा, माझा अमिताभ` असं संघर्षचं यावेळंचं घोषवाक्य आहे.... दहा थर लावणा-या पथकाला यावेळी तब्बल 30 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा संघर्षचे अध्यक्ष जिंतेंद्र आव्हाड यांनी केलीय..... याशिवाय या पथकाला इंडिया गेटसमोर थर लावण्याचा मानही देण्यात येणार आहे.... या प्रसिद्ध दहीहंडीचं चित्रिकरण यावेळी तब्बल 30 कॅमे-यांनी केलं जाणार आहे.
दहीहंडीच्या वेळी थर लावताना जखमी झालेल्या गोविंदांना 20 हजार रुपये आणि गंभीर दुखापत झाल्यास दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल अशी माहितीही आव्हाड यांनी दिलीय.... या सणाला इंटरनॅशनल स्ट्रीट फेस्टीवलचा दर्जा देण्याची मागणीही आव्हाड यांनी केलीय.... नेहमीप्रमाणे स्पेनचे खेळाडूही याठिकाणी हजर लावणार आहेत.... त्यांचाही उत्साह दांडगा आहे.
कृष्णजन्माष्टमीला मध्यरात्रीच मानाच्या हंड्या टांगल्या जातात. ठाण्याच्या संघर्ष प्रतिष्ठानची दहीहंडीची पूजा करुन टांगण्यात आली. यंदा या पूजेत मुस्लीम बांधवही सहभागी झाले होते. हिंदू मुस्लीम ऐक्य या दहीहंडीच्या निमित्तानं पहायला मिळालं, मुस्लीम बांधवांनी नमाज पठण करुन इश्वराची करुणा भाकली. त्यानंतर हंडीला आकाशात टांगण्यात आलं.
दहीहंडी उत्सवाची उत्सुकता शिगेला पोहचलीये. ठाण्यात गोविंदा पथकांवर बक्षीसांचा वर्षाव करण्यात येणारंय. संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे याही वर्षी दहीहंडीची जय्यत तयारी करण्यात आलीये. दहा थर लावणा-या गोविंदा पथकाला तब्बल 25 लाखांचं बक्षीस देण्यात येणार असल्याचं प्रतिष्टानचे अध्यक्ष आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय. तर 9 थर यशस्वीपणे बसविणा-या पथकाला 11 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. यावर्षी स्त्री-भ्रूण हत्येविषयी जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचंही सरनाईक यांनी सांगितलंय.
मुंबई ठाण्याप्रमाणं आता नागपुरातही महिलांसाठी स्पेशल दहीहंडीचं आयोजन करण्यात येवू लागलयं. अनेक मंडळांनी महिलांसाठी स्पेशल अशा दहीहंडीचं आयोजन केलयं. काही शाळा महाविद्यालयांनी एक दिवस अगोदरच विद्यार्थिनींसाठी दहीहंडीचं आयोजन केलं होतं. नागपुरात महिला गोविंदांसाठी पोषक वातावरण तयार केलं जातयं. नागपुरातल्या इतवारा नवयुवक मंडळानं यासाठी पुढाकार घेतलाय.
ठाण्यातील चिंतामणी चौकात सेनेचे आमदार राजन विचारे यांच्या वतीनं आयोजित महादहीहंडी निमित्त दरवर्षी कँन्सर पीडित मुलांच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात येतं. यंदा देखील उमंग या संस्थेच्या मुलांच्या हंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. राजन विचारे यांच्या समोर त्या मुलांनी हंडी फोडली. या वेळी राजन विचारे यांच्या हस्ते मुलांना ट्रॉफी आणि बक्षिसाचं वाटप करण्यात आलं. अश्या प्रकारे हंडीचे आयोजन करण्याचे आनंद चॅरीटेबल ट्रस्टचं यंदाचं ७ वं वर्ष आहे.
टेंभी नाक्यावरची दहीहंडी ही ठाण्यातली मानाची दहीहंडी समजली जाते. प्रत्येक मंडळ या हंडीला सलामी दिल्याशिवाय पुढे जात नाही. यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे मुंबईकर गोविदांसाठी यंदा ही हंडी सोन्याची असणार आहे. म्हणजेच हंडी फोडणा-या गोविंदा पथकांना 4 लाख 51 हजार मिळणार आहेत. महिला गोविंदा पथकांकरता 51 हजार रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलंय. सेलिब्रिटींचा तडकाही या हंडीमध्ये असणार आहे.
ठाण्यातल्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टनं दहीहंडीला यंदा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिलीय. ठाण्याच्या रंगो बापुजी चौकामध्ये हा उत्सव होतोय. मुंबई आणि ठाणेमधल्या गोविंदा पथकांसाठी यंदा १ लाख ११ हजार ११ रुपयांची रोख बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. तर महिला गोविंदा पथकांसाठी ५१ हजारांचं बक्षीस ठेवण्यात आलंय.
मराठी कलाकारांच्या फॅशन शो
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं यंदा देखील मराठी कलाकारांच्या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या शो मध्ये मराठी अभिनेता संतोष जुवेकरसह श्रुती मराठे, सई लोकूर, सई ताम्हनकर यांच्या समवेत अनेक सिने तारे - तारकांनी रॅम्प वॉक केला. यावेळी अभिनेता संतोष जुवेकरनं दहीहंडी देखील फोडली.