www.24taas.com, मुंबई
मुंबईची जगातल्या घाणेरड्या शहरांच्या क्रमवारीतली आघाडी कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे. ट्रीप अँडव्हायझर सिटीने केलेल्या सर्वेक्षणात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जगातील 40 मोठ्या शहरांमध्ये सुमारे 75 हजार लोकांच्या साहाय्याने हे सर्वेक्षण करण्यात आलं.
स्वच्छतेत मुंबईचा 40 वा क्रमांक आहे. आणि अर्थात तो शेवटचा क्रमांक आहे. शहरातले ड्रायव्हर्स उद्धट असल्याचंही यात स्पष्ट करण्यात आलंय. तर टोकिओने सगळ्याच पातळींवर अव्वल क्रमांक पटकवलाय. शहरात येणारे पर्यटक, उद्योजक, प्रवासी यांनी मुंबईतले रस्ते आणि आसपासचा परिसर जगात सर्वात घाणेरडा असल्याचं म्हटलंय.
शहरातल्या रस्त्याच्या कोप-याकोप-यावर कच-यांचा ढीग पडलेला असतो. दुर्गंधीने लोक हैराण असतात असंही या सर्वेक्षणात म्हटलं आहे. मात्र शॉपिंगसाठी पर्यटकांनी मुंबईला पसंती दिलीय. शॉपिंगमध्ये मुंबईला 27 वी रँक देण्यात आलीय.