सांताक्रूझमध्ये महिला पत्रकारांची छेडछाड, गुंडांचा हैदोस

सांताक्रूझमध्ये आज झालेल्या सिलेंडर स्फोटाच्या बातमीसाठी गेलेल्या महिला पत्रकाराची छेडछाड झाल्याची घटना घडली. स्थानिक गुंडांनी दादागिरी करत महिला पत्रकाराची छेड काढून कॅमेरामन आणि आणखी एका पुरूष पत्रकारालाही मारहाण केलीय. 

Updated: Jul 16, 2015, 06:43 PM IST
सांताक्रूझमध्ये महिला पत्रकारांची छेडछाड, गुंडांचा हैदोस title=

मुंबई: सांताक्रूझमध्ये आज झालेल्या सिलेंडर स्फोटाच्या बातमीसाठी गेलेल्या महिला पत्रकाराची छेडछाड झाल्याची घटना घडली. स्थानिक गुंडांनी दादागिरी करत महिला पत्रकाराची छेड काढून कॅमेरामन आणि आणखी एका पुरूष पत्रकारालाही मारहाण केलीय. 

महिला पत्रकारांना अश्लिल शिवीगाळ, छेडछाड, मारहाण आणि दगडफेक करून आपलं पौरुषत्व दाखवण्याचा प्रयत्न या गुंडांनी केला. दरम्यान, सलमान नाव असलेल्या या गुंडाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 
 
एबीपी माझा, टीव्ही 9, मी मराठी या चॅनलच्या महिला प्रतिनिधींवरही या गुंडांनी हल्ला चढवला. यामध्ये टीव्ही 9च्या महिला कॅमेरापर्सनला मारहाण करण्यात आली. त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. 

गुंडांनी महिला पत्रकाराला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.