मुंबई: दक्षिण मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये सुमारे साडे पाच वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. क्रॉफर्ड मार्केटमधल्या फळबाजाराला ही आग लागली होती. या आगीत सुमारे शंभरहून जास्त दुकानं जळून भस्मसात झाली.
अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी तात्काळ रवाना झाल्या. तर सात वॉटर टँकरही घटनास्थळी पोहोचले. त्यांच्याकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र ही आग कशामुळं लागली याचं कारण तपासानंतरच कळेल, असं चीफ फायर ऑफिसर रहांगडाले यांनी सांगितलं.
क्रॉफर्ड मार्केटमध्ये अतिशय गजबजलेली दुकानं आहेत. ही आग फळ बाजाराला लागलीय. महापालिका आयुक्त अजोय मेहेता यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. रविवार असल्यानं मार्केट बंद होतं. दरम्यान या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Massive fire at Crawford Market in Mumbai this morning.10 fire tenders were rushed to spot,fire now under control. pic.twitter.com/f76E0jFnVc
— ANI (@ANI_news) October 25, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.