महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडल्या आहेत. पालिका शाळेतील मुलांच्या पिकनिकचे दीड कोटी रूपयांचे विनाटेंडर काम एकाच व्यक्तीला देण्यासाठी शिक्षण विभागातील अधिका-यांवर दबाव टाकल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. 

Updated: Dec 3, 2015, 08:25 AM IST
महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात title=

मुंबई : मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडल्या आहेत. पालिका शाळेतील मुलांच्या पिकनिकचे दीड कोटी रूपयांचे विनाटेंडर काम एकाच व्यक्तीला देण्यासाठी शिक्षण विभागातील अधिका-यांवर दबाव टाकल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. 

यासिन तांबोळी नावाच्या व्यक्तीला पिकनिकचे काम देण्याच्या सूचना महापौरांनी सर्व शिक्षण विभागातील सहायक अधिका-यांना दिल्याचा आरोप स्थायी समितीत काँग्रेसच्या प्रविण छेडा यांनी केला. चौथी, सातवी आणि आठवीच्या सुमारे ३७ हजार विद्यार्थ्यांना पिकनिकवर नेण्याच्या कामाचे ई टेंडर काढले गेले होते. 

परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्यानं विभाग स्तरावर काम देण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या होत्या. भाजपनंही महापौरांचे नाव न घेता अशा प्रकारे काम दिल्याच्या गोष्टीला दुजोरा दिला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.