मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई मेट्रोने महिलांना एक महत्वाची भेट दिलीय. लोकलप्रमाणे आता मेट्रोमध्येही महिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था असणार आहे. यामुळे निश्चितच महिलांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे.
मेट्रोत वर्सोव्याच्या दिशेला असलेल्या डब्याती अर्धी जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहे. स्ट्रिप सेपरेटरच्या मदतीने डब्याचे दोन भाग करण्यात येणार आहेत. यातीस 24 सीट या आरक्षित असणार आहेत.
मात्र इतर डब्यातील महिलांसाठी आरक्षित असलेली जागा काढण्यात येईल. तसेच अपंग आणि वृद्ध प्रवाशांसाठी चार सीट्स राखीव असतील. महिलांसाठी आरक्षित डब्यातून पुरुषांनी प्रवास केला तर त्यांच्याकडून दंडही वसूल होणार आहे. या डब्यातून 12 वर्षांखालील मुलांना प्रवेश आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.