मुंबई : मुंबई मेट्रोच्या नवीन लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या लोगोची संकल्पना तुम्हाला नक्कीच आवडेल. पाहा काय आहे ही संकल्पना?
हा लोगो जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टच्या 13 विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. 500 जणांमधून तिघांची निवड करण्यात आली. त्यातून शेवटी एकाची निवड झाली. हा लोगो डिजाईन केलाय जुईली माहिमकर हिने.
तिची या लोगो मागची संकल्पना खूप सुंदर आहे. या लोगोत मुंबईचा मुं जरासा कलता केलाय, 7 रेषा म्हणजे मुंबईला वेढलेली 7 बेटे दाखविण्याचा प्रयत्न केला गेलाय. तसेच धावती मेट्रो, मानवी प्रतीक एक ठिपका आहे. जो आहे सतत धावणारा मुंबईकर आणि निळा रंग जो स्थिरता आणि कणखर (स्ट्राँग) असा आहे. तसेच निळ्या रंगातून पाणी दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आता हा नवीन मुंबई मेट्रोचा लोगो मुंबईभर झळकणार आहे.