मुंबई : निवडणूक आयोगाकडून आचार संहिता शिथील करण्यात आलीय. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातच आचारसंहिता लागू असणार आहे.
निवडणूक नसलेल्या क्षेत्रात सर्व कामं करण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. मात्र निवडणूक असलेल्या क्षेत्रातल्या मतदारांवर प्रभाव टाकू शकणारा निर्णय अथवा घोषणा करण्यावर मात्र बंदी आहे.
मंत्री, खासदार, आमदार किंवा पदाधिका-यांना अशी घोषणा करता येणार नाही. सरकारने निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथील करण्याची मागणी केली होती.