मुंबई पालिका आयुक्तांना मनसेची कायदेशीर नोटीस

Updated: Feb 25, 2015, 08:58 AM IST
मुंबई पालिका आयुक्तांना मनसेची कायदेशीर नोटीस title=

मुंबई मुंबई महानगरपालिका आयुक्त सीताराम कुंटे याना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस पाठविण्याबाबत शिवसेनेची भूमिका मह्त्वाची ठरली. कारण LED दिव्यांबाबत मनसे-शिवसेनेत एकमत झाल्याने मनसेने नोटीसीचे पाऊल उचलले.

मनसे महानगरपालिका गटनेते संदीप देशपांडे यांनी वकिलांमार्फत पालिका आयुक्त कुंटे यांनी नोटीस पाठवाली आहे. LED दिव्यांच्या कामाच्या प्रस्तावावरुन ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे LED दिव्यांच्या कामावर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मनसेनं कायदेशीर पाऊल उचलल्यानं शिवसेना - मनसे यांचे सूर LEDवरुन जुळले आहेत का, अशी चर्चाही सुरु झालीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.