मुंबई : महापालिकेतल्या टॅब घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पालिका अधिका-यांना फटकारले. चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेत. विद्यार्थ्यांना दिलेले 10 हजार टॅब बंदच असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे चौकशीत पुढे काय येते याकडे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिकेतल्या तब्बल ५० कोटी रूपयांच्या टॅब घोटाळा प्रकरणी म्हस्के यांनी याचिका दाखल केलीय. याबाबतच्या चौकशीसाठी आता समिती स्थापन करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. विद्यार्थ्यांनाही पार्टी करुन घ्या, असं त्यांनी सांगितलं. सध्या विद्यार्थ्यांचे १०,००० टॅब बंद असून, यंदा नववीच्या विद्यार्थ्यांना टॅब दिलेलेच नाहीत.