मुंबई : मुंबईमध्ये हायप्रोफाईल स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांच्या समाजसेवा विभागानं पर्दाफाश केलाय.
अंधेरीमध्ये असलेल्या या स्पामध्ये देहविक्रय होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी याची खात्री करून घेतली आणि काल रात्रीच्या वेळेस छापा मारला.
या कारवाईत स्पाच्या मालकाला अटक करण्यात आलीये. तर 3 मुलींची सुटका करण्यात आलीये. या मुलींना कोलकात्याहून आणण्यात आलं होतं तसंच त्या तिघीही अल्पवयीन असल्याचं समजतंय.