राणीच्या बागेत यंदाही उद्यान प्रदर्शनाचे आयोजन

राणीबागेत दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्यान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलंय. तीन दिवस चालणा-या या प्रदर्शनात कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे, फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोन्साय यांचे अक्षरशः शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.

Updated: Jan 13, 2017, 10:46 PM IST
राणीच्या बागेत यंदाही उद्यान प्रदर्शनाचे आयोजन title=

मुंबई : राणीबागेत दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्यान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलंय. तीन दिवस चालणा-या या प्रदर्शनात कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे, फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोन्साय यांचे अक्षरशः शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.

लहान मुलांसाठी फुलांपासून तयार करण्यात आलेले कार्टून कॅरेक्टर्स आधारित पुष्प रचना, हे यावर्षीच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे. रविवारपर्यंत चालणारे हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी