रोहितच्या आई, भावाने स्वीकारला बौद्ध धर्म

रोहित वेमुलाची आई आणि भाऊ यांनी आज हिंदू धर्माला सोडून, बौद्ध धर्म स्वीकारला. हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या केलेला रिसर्च स्कॉलर रोहित वेमुलाची आई आणि भाऊ यांनी आज, दादरच्या आंबेडकर भवनात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यावेळी रिपब्लिकन नेते डॉ. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.

Updated: Apr 14, 2016, 04:42 PM IST
रोहितच्या आई, भावाने स्वीकारला बौद्ध धर्म title=

मुंबई : रोहित वेमुलाची आई आणि भाऊ यांनी आज हिंदू धर्माला सोडून, बौद्ध धर्म स्वीकारला. हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या केलेला रिसर्च स्कॉलर रोहित वेमुलाची आई आणि भाऊ यांनी आज, दादरच्या आंबेडकर भवनात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यावेळी रिपब्लिकन नेते डॉ. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.

हैदराबाद विद्यापीठात पीएच.डी. करणाऱ्या रोहितने जानेवारीत आत्महत्या केली होती. रोहितच्या आत्महत्येनंतर देशात मोठा गदारोळ झाला होता. या आत्महत्येला भाजप, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विद्यापीठ प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही झाला. यावरून संसदेत वादळी चर्चाही झाली होती. 

दलित असल्याने रोहितचे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेरीस आता रोहितची आई राधिका वेमुला आणि भाऊ राजा वेमुला यांनी हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय घेतला.