Video : विक्रोळी स्टेशनवर लोकल व्यक्तीच्या अंगावरुन गेली

एक धक्कादायक व्हिडिओ. हा व्हिडिओ आहे एका आत्महत्येचा. मुंबईत विक्रोळी रेल्वे स्टेशनवर लोकल प्लॅटफॉर्मवर येत असताना एक व्यक्ती अचानक लोकल ट्रेनसमोर येऊन थांबली. आणि ही लोकल त्याच्या अंगावरून गेली.

Updated: Jun 21, 2016, 12:49 PM IST
Video : विक्रोळी स्टेशनवर लोकल व्यक्तीच्या अंगावरुन गेली title=

मुंबई : एक धक्कादायक व्हिडिओ. हा व्हिडिओ आहे एका आत्महत्येचा. मुंबईत विक्रोळी रेल्वे स्टेशनवर लोकल प्लॅटफॉर्मवर येत असताना एक व्यक्ती अचानक लोकल ट्रेनसमोर येऊन थांबली. आणि ही लोकल त्याच्या अंगावरून गेली.

विक्रोळी स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये आत्महत्येची ही दृश्य कैद केली आहेत. २० जूनला म्हणजे काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एक ४० वर्षे वयाची व्यक्ती अचानक स्टेशनला येत असलेल्या ट्रेनसमोर आली आणि आत्महत्या केली. या व्यक्तीची ओळख अजूनही पटलेली नसल्याने त्याच्या नातेवाईकांचाही शोध लागू शकलेला नाही.