मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुकर, मेट्रोच्या दोन प्रकल्पांना मंजुरी

 मेट्रो-2 चा उर्वरित टप्पा आणि मेट्रो-4 मार्गाला राज्य मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार आहे.

Updated: Sep 27, 2016, 02:34 PM IST
मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुकर, मेट्रोच्या दोन प्रकल्पांना मंजुरी title=

मुंबई :  मेट्रो-2 चा उर्वरित टप्पा आणि मेट्रो-4 मार्गाला राज्य मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार आहे.

मेट्रो-2 चा उर्वरित टप्पा डीएन नगर-वांद्रे-मानखुर्द असा असेल. हा मार्ग 24 किमीचा असेल तर मेट्रो-4च्या 33 किमी मार्गालाही मंजुरी देण्यात आलीय.

वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली असा हा मार्ग असेल. येत्या 4 वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मेट्रो-4मुळे मुंबई आणि ठाणे आणखी जवळ येणार आहे.