मुंबई: एलजीबीटी कम्युनिटीचे पाच प्रतिनिधी लवकरच मुंबईच्या रस्त्यांवर टॅक्सी चालवताना दिसतील. हे पाच जण रेडिओ कॅब चालक म्हणून मुंबईत शोफरच्या रुपात दिसणार आहेत. देशातल्या पहिल्या रेडिओ कॅबचे चालक होण्यासाठी 'हमसफर' या संस्थेच्या पाच जणांची निवड करण्यात आली आहे. सारिका, शिल्पा शर्मा, सूरज ठाकुर, अंकित त्रिवेदी आणि संजीवनी चव्हाण अशी या पाच जणांची नावं आहेत.
स्वाभिमानानं पैसे मिळवण्यासाठी याचा फायदा आम्हाला नक्की होईल, अशी प्रतिक्रिया कॅब चालक संजीवनी चव्हाण यांनी दिली.या पाचही जणांना रेडिओ कॅब चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्यानंतर या रेडिओ कॅब मुंबईच्या रस्त्यावर धावतील.
विंग्स नावाच्या कंपनीनं ही रेडिओ कॅब तयार केली आहे. या कॅबमध्ये प्रवाशांसाठी हेल्प अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. प्रवाशानं मदत मागताच हे बटण अॅक्टिव्हेट होईल आणि कारचे फोटो निघतील. त्यानंतर जीपीएसवर ही कार ट्रेस करण्यात येईल. तसा डेटा पोलिसांकडे पाठवण्यात येईल.