लोकल प्रवाशांसाठीच्या MUTP3चा शुभारंभ

मुंबई आणि परिसरातील लोकल प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या MUTP 3 प्रकल्पाचा शुभारंभ आज रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते झाला.

Updated: Jun 28, 2015, 04:32 PM IST
लोकल प्रवाशांसाठीच्या MUTP3चा शुभारंभ title=

मुंबई : मुंबई आणि परिसरातील लोकल प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या MUTP 3 प्रकल्पाचा शुभारंभ आज रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते झाला.

11 हजार 44 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे जीवघेणा लोकल प्रवास सुखकर होणार आहे. पुढील 7 ते आठ वर्षात या प्रकल्पातील काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. सह्याद्री अतिथिगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी राज्यासाठी अनेक घोषणा केल्या, त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईतील सध्याच्या रेल्वे ट्रैकवर उन्नत असा रेल्वे आणि रस्ता मार्ग उभारणे गरजेचे असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी स्पष्ट केलं. तर याबाबत MMRDA दोन महिन्यात अहवाल देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईत लोकल सेवा ,बेस्ट सेवा, मोनो आणि मेट्रो सेवा सहज वापरता येईल अशी सिंगल तिकिटिंग व्यवस्था लवकरच तयार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलं. राज्यातील रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारची याची " लोहमार्ग विकास कंपनी " स्थापन करण्यात आली आहे. यामुळे चांगला समन्वय राहत प्रकल्प लवकर पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

एमयूटीपी ३ मध्ये काय होणार 

- विरार-डहाणू मार्गाचे चौपदरीकरण यासाठी ३५५५ कोटी रुपये

- पनवेल ते कर्जत दरम्यान नवी रेल्वे कॉरि़डोअर

-  नवीन ऐरोली-कळवा एलिवेटेड कॉरि़डोअर 

- मुंबई सेंट्रल, लोअर परेल, दादर (वेस्ट) वांद्रे, खार, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, मीरारोड, भाईंदर आणि विरार स्टेशनचा पुनर्विकास

- दादर (सेंट्रल) कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण, शहाड या सेंट्रलवरील स्टेशनचा पुनर्विकास

- वडाळा रोड, चेंबूर या हार्बरवरील स्टेशनचा पुनर्विकास 

या सर्व कामांसाठीचा अपेक्षित खर्च ११ हजार ४४१ कोटी रुपये. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.