चर्चगेटला डेडएंडला लोकल धडकली, मोटारमन जखमी

 मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकात लोकल शटींगच्या वेळी लोकल प्लॅटफॉर्मच्या डेड एंडला धडकून ती किमान दहा फूट पुढे आली.   या अपघातात मोटरमनसह तीन प्रवासी जखमी झाले  आहेत. चर्चगेट रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर हा अपघात झाला आहे.

Updated: Jun 28, 2015, 02:32 PM IST
चर्चगेटला डेडएंडला लोकल धडकली, मोटारमन जखमी title=

मुंबई : मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकात लोकल शटींगच्या वेळी लोकल प्लॅटफॉर्मच्या डेड एंडला धडकून ती किमान दहा फूट पुढे आली.   या अपघातात मोटरमनसह तीन प्रवासी जखमी झाले  आहेत. चर्चगेट रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर हा अपघात झाला आहे. 

या प्रकरणी लोकल मोटारमन, गार्ड आणि लोकल इन्स्पेक्टर यांना चौकशी होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

लोकल प्लॅटफॉर्मला धडकल्यानं मोटरमन जखमी झाला आहे. शिवाय अपघातग्रस्त लोकलचं मोठं नुकसान झालं आहे.

या घटनेमुळे पश्चिम रेल्वेमार्गावरील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चेगेटहून सुटणाऱ्या सर्व लोकलवर या अपघाताचा परिणाम झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.