नारायण मूर्तींची `इन्फोसिस`मध्ये पुन्हा एन्ट्री

नारायण मुर्तींचे आयटी कंपनी ‘इन्फोसिस’मध्ये पुनरागमन झालंय. कंपनीचे विद्यमान संचालक के. व्ही. कामत यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला असून त्याऐवजी मुर्तींची पुन्हा निवड करण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 2, 2013, 07:25 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नारायण मुर्तींचे आयटी कंपनी ‘इन्फोसिस’मध्ये पुनरागमन झालंय. कंपनीचे विद्यमान संचालक के. व्ही. कामत यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला असून त्याऐवजी मुर्तींची पुन्हा निवड करण्यात आलीय.
मुर्ती यांनी कंपनीचे अध्याक्ष म्हणून २०११ मध्ये राजीनामा देऊन मानद अध्यक्षपद स्विकारले होते. परंतु, आता त्यांना संचालक मंडळाने कार्यकारी अध्यक्ष आणि अतिरिक्त संचालक म्हणून पुढील पाच वर्षांसाठी नियुक्त केले आहे. मुर्तींची कार्यकारी संचालक म्हणून निवड करण्यात आली असून ते आगामी पाच वर्ष केवळ एक रुपया वार्षिक वेतनवर काम करणार आहेत. मूर्ती यांचा एकुलता एक व कॉम्प्युटर सायन्समध्ये पी. एचडी मिळवलेला मुलगा रोहन त्यांचा सहाय्यक असेल. एस. गोपालकृष्णन हे पुन्हास कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून पदभार स्विकारणार आहेत तर एस. डी. शिबुलाल हे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदावर कायम राहणार आहेत. मुर्ती यांच्या नियुक्तीची माहिती मुंबई शेअर बाजाराला कळवण्यात आले असून ते आजपासून तातडीनं पदभार स्विकारणार असल्याची माहिती कंपनीनं दिलीय. उद्योग विश्वानंही मुर्ती यांच्या नियुक्तीचं स्वागतं केलंय.
याबद्दल बोलताना ‘हा अतिशय अचानक आणि अनपेक्षित निर्णय आहे… इन्फोसिस मला अपत्याप्रमाणे आहे… पूर्वनियोजित कामं बाजूला ठेवून मी सूत्र स्वीकारत आहे... मला ही संधी दिल्याबद्दल के. व्ही. कामथ आणि इन्फोसिसच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार’ अशी प्रतिक्रिया नारायण मुर्ती यांनी दिली आहे.

कंपनीची वाढ, आयटी क्षेत्रातील नवी आव्हानं यांना तोंड देण्यासाठी आणि गुंतवणूकदारांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं के. व्ही. कामत यांनी म्हटलंय. नारायण मुर्ती यांनी इन्फोनसिसच्यात कामातून अंग काढल्यानंतर कंपनीची बरीच पिछेहाट झाली. इतर स्पीर्धक कंपन्यांनी इन्फोवसिसला मागे टाकले. सर्वप्रथम टीसीएस, नंतर एचसीएल आणि नुकतेच कॉग्निझन्टनं इन्फोसिसला झटका देत मागे टाकले. त्याममुळे कंपनीला पुन्हा् जुने वैभव प्राप्ता करुन देण्याकसाठी संचालक मंडळाला मुर्ती यांनाच साकडे घालावे लागले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.