नारायण राणेंचा सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. नारायण राणे हे सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. 

Updated: Jul 17, 2014, 09:07 PM IST
नारायण राणेंचा सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा title=

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. नारायण राणे हे सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. 

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात नारायण राणे यांचं हे बंड असल्याचं म्हटलं जात आहे.

मात्र नारायण राणे हे मंत्रीपदाचा राजीनामा देणार असले, तरी ते पक्ष सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. म्हणून सुरूवातीला राजकीय वर्तुळात हा भूकंप वाटत होता. 

पण नारायण राणेने काँग्रेसमध्येच राहणार असल्याने या राजकीय भूकंपाची तीव्रता कमी झाल्या सारखच आहे.

दरम्यान, यापूर्वी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले उद्योगमंत्री नारायण राणे बंडाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा जोरात सुरू होती. उद्यापासून राणेंचा ३ दिवसांचा कोकण दौरा सुरू होत आहे. 

राणे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी न लागल्याने ते नाराज आहेत. त्यामुळे ते आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार की थेट काँग्रेस सोडणार याची उत्सुकता लागली होती. राणे कोणत्या पक्षात जाणार याचीही चर्चा सुरु झाली होती ते भाजप किंवा राष्ट्रवादीचा पर्याय निवडतील असे बोलले जात होते.

कोकणात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची राणेंनी तयारी केली आहे. आता तरी मंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी या दौ-यात जनमताचा कानोसा घेऊन राणे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.