मुंबई : आरपीआयनं भाजपकडे 8 जागांची मागणी केलीय. आरपीआयचे नेते अविनाश महातेकर, सुमंत गायकवाड यांनी आज भाजप नेते विनोद तावडेंची भेट घेऊन ही मागणी केलीय. दरम्यान, महायुतीवर काँग्रेस नेते नारायण राणे यांनी टीका करताना हल्लाबोल केला.
आरपीआय नेत्यांनी चेंबूर, कुलाबा, पिंपरी, केज, गंगाखेड, चाळीसगाव, उत्तर नागपूर, बदलापूर या जागांची मागणी केलीय.... त्यावर विनोद तावडे यांनी दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचं आश्वासन आरपीआय नेत्यांना दिलंय.
शिवसेना भाजप युतीमध्ये बेबनाव होईल अशी चिन्हे निर्माण झालीत. एकीकडे जागा वाटपात निम्म्या जागा मिळाव्यात म्हणून भाजपचे नेते ठाम आहेत. शिवाय निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप अध्यक्ष अमित शहा उद्या मुंबईत येतायत. मात्र शिवसेना नेत्यांना ते भेटणार नसल्यानं युतीत आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
महायुतीत घुसफूस सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री आणि काँग्रेसचे प्रचारसमिती प्रमुख नारायण राणेंनी महायुतीतला टोला लगावलाय. महायुतीतले पक्ष एकत्रित लढोत वा स्वतंत्रपणे काँग्रेस आघाडीचाच विजय होणार असा विश्वास राणेंना आहे.
कणकवलीत नीतेश राणे हेच काँग्रेसचे उमेदवार असतील, नीतेश राणेंना विरोध करणा-या विजय सावंत यांना पक्षाने साधे मुलाखतीसाठीही बोलावलं नाही असं वक्तव्यही राणेंनी मालवण इथं पत्रकारपरिषदेत केलयं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.