www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नवरात्र उत्सवात राजकीय होर्डींग लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं असा आदेश काढला आहे. जर कोणी राजकीय होर्डींग लावले तर त्याचे काही खरे नाही.
मुंबई हायकोर्टानं उत्सवादरम्यान राजकीय होर्डिंगबाजीबाबत मनपाला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसंच कारवाईला टाळाटाळ करणा-या पालिकेला कडक शब्दांत फटकारले होते. त्यापार्श्वभूमीवर आता मनपानं कठोर पावलं उचलली आहेत.
शक्तीचं प्रतीक मानलं जाणा-या देवीचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. राज्यात तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहुरची रेणुका, हे तीन पूर्ण पीठं तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्ध शक्तीपीठ मानलं जातं. नवरात्रीच्या निमित्तानं आज घरोघरी घटस्थापना करण्यात आली. स्त्रिला अन्यायाविरोधात लढण्याची शक्ती मिळावी म्हणूनही नऊ रात्री देवीचा जागर करण्यात येईल.
दरम्यान, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सणाला गालबोट लागलंय. तुळजापूरातील तुळजाभवानी देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला. १९ भावीक जखमी झालेत. त्यापैकी १० भाविकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सोलापूरच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडलाय. आज नवरात्रीचा पहिलाच दिवस असल्यामुळे देविचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी उसळली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
व्हिडिओ पाहा