गणेश मंडप उभारताना याची काळजी जरूर घ्या, अन्यथा...

गणेशोत्सवाच्या तयारीत अनेक जण गढून गेलेत. तुम्हीही गणेशोत्सवाची तयारी करत असाल तर यंदा मंडप उभारताना तुम्हाला न्यायालयानं दिलेल्या निर्देशांची काळजी नक्की घ्यावी लागेल. अन्यथा, अशा मंडपांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. 

Updated: Aug 4, 2015, 10:42 AM IST
गणेश मंडप उभारताना याची काळजी जरूर घ्या, अन्यथा...  title=

मुंबई : गणेशोत्सवाच्या तयारीत अनेक जण गढून गेलेत. तुम्हीही गणेशोत्सवाची तयारी करत असाल तर यंदा मंडप उभारताना तुम्हाला न्यायालयानं दिलेल्या निर्देशांची काळजी नक्की घ्यावी लागेल. अन्यथा, अशा मंडपांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. 

मंडप आणि ध्वनी प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांचंच पालन केले जाईल, असा निर्वाळा देत राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात ध्वनी प्रदूषण आणि मंडप उभारण्यासंदर्भातील धोरणात्मक अहवाल सादर केला. 

यानुसार बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशन, हॉस्पिटल आणि गर्दीच्या ठिकाणी मंडप उभारण्याकरता परवानगी दिली जाणार नाही. तसंच ३० फुटांपेक्षा जास्त उंचीचे मंडपदेखील उभारण्याकरता परवानगी दिली जाणार नाही, असं राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या आपल्या अहवालात म्हटल आहे .

नागरिकांना ध्वनी प्रदूषण आणि रस्त्यांवरील मंडपांबाबत तक्रार करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची विभागवार नेमणूक करण्यात आल्याचे या शासकीय अहवालात सांगण्यात आलंय. 

दुसरीकडे गेल्या सुनावणीला मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयाकडे  गेल्या वर्षीच्या धर्तीवर मुंबईतील मंडळांना रस्त्यावर मंडप टाकण्याचे आदेश द्यावेत, अशा आशयाची बीएमसीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती... आणि आता राज्य सरकारने दिलेल्या अहवालानुसार बीएमसीला मंडळांना परवानगी द्यावी लागणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.